शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेतून अखेर पाणी सुरू : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:23 IST

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी ...

ठळक मुद्देसंजयकाका पाटील यांच्याहस्ते कळ दाबून उद्घाटन, पंधरा कोटी रुपये प्राप्त

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.

खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी व भाजप, काँग्रेस पदाधिकाºयांनी नारळ फोडले. म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. मला राजकीय श्रेय घ्यायचे नाही; मात्र थकीत वीज बिलासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, असे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारणाला बगल देऊन सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खा. पाटील यांनी केले. म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल आ. खाडे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचे अभिनंदन केले. ८१-१९ या नवीन फॉर्म्युल्यामुळे यापुढे म्हैसाळ योजना सक्षमपणे सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये रक्कम शुक्रवारी महावितरणकडे वर्ग झाल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू होऊन आज पहिल्या टप्प्यातील दोन पंप सुरू करण्यात आले. रखडलेले म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. थकीत वीजबिलापोटी म्हैसाळचे आवर्तन रखडल्याने शेतकरी हवालदिल होते. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी ने व सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीबाबत लवकर निर्णय होत नसल्याने संजयकाका पाटील व आ. खाडे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला.

गतवर्षी आॅगस्ट महिन्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील दोन पंप आज सुरू करण्यात आले असून, उद्यापर्यंत आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. आवर्तन सुरू झाल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायतक्षेत्र अवलंबून असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण राजमाने, मोहन वनखंडे, मकरंद देशपांडे, परशुराम नागरगोजे, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, दिलीप पाटील, किरण बंडगर, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे यांच्यासह म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, सूर्यकांत नलवडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.राजकीय कळ : दोन नेत्यांत जुंपलीआवर्तनाच्या प्रारंभालाच उपस्थितीवरून भाजप आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉँग्रेस नेते अनिल आमटवणे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात पुढे जाण्याच्या कारणावरून जोरदार वादावादी व परस्परांना शिवीगाळ झाली. आमटवणे व भोसले यांनी एकमेकाला बघून घेण्याचा इशारा दिला. खा. संजय पाटील यांनी मध्यस्थी करून आमटवणे यांच्या हस्ते नारळ फोडला. अनिल आमटवणे, तानाजी पाटील, वसंत गायकवाड या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी खा. संजयकाका पाटील यांचे कौतुक करीत आ. सुरेश खाडे यांच्यावर टीका केली.